उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी अमळनेर येथील लोकशाही दिनी केले आवाहन…
अमळनेर:- नागरिकांनी आर्थिक लूट आणि विलंब थांबवण्यासाठी रेशन कार्ड आणि संजय गांधी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावेत वैयक्तिक कोणाकडे देऊ नये असे आवाहन उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी अमळनेर येथील लोकशाही दिनी तक्रारींचा निपटारा करताना केले.
२३ रोजी अमळनेर नगरपालिकेच्या सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. वाहतुकीची कोंडी , अतिक्रमण, पुलावरील बाजार, रेशन कार्ड, दुय्यम प्रत मिळणे, रस्त्यावरील अतिक्रमण काढणे याबाबत नगरपालिका, बांधकाम विभाग , पोलीस प्रशासन , महसूल विभाग यासह काही विभागाच्या एकूण २१ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. उपविभागीय अधिकारी मुंडावरे यांनी काही तक्रारींचा जागेवर निपटारा केला तर उर्वरित तक्रारी आठ दिवसात संपवा असे निर्देश संबंधित विभागाला दिलेत.
यावेळी रोजगार हमी योजनेच्या अर्चना मोरे ,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , सहाय्यक निबंधक व्ही एम जगताप , गटविकास अधिकारी एन आर पाटील , डिगंबर वाघ , नायब तहसीलदार प्रशांत धमके ,राजेंद्र ढोले, पुरवठा निरीक्षण अधिकारी ,रूकसाना शेख , पोलीस निरीक्षक विकास देवरे , उपविभागीय कृषी अधिकारी सी डी साठे, महिला बालविकास अधिकारी प्रेमलता पाटील, रुपाली अडकमोल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी, अश्वमेध पाटील, अजय कुलकर्णी, अभियंता भागवत माळी, अविनाश खैरनार आदी अधिकारी हजर होते. सूत्रसंचालन डी ए धनगर यांनी केले.
यावेळी सुनील पाटील ,सुपडू पाटील ,संजय पाटील , सिद्धार्थ कढरे , गौतम बिऱ्हाडे , शुभम भोई , गुलाबराव पाटील , अनंत निकम , अशोक पाटील , महेंद्र पाटील यांच्यासह तक्रारदार हजर होते.
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येईल. नागरिकांनी सार्वजनिक तक्रारी न करता वैयक्तिक तक्रारी कराव्यात असे आवाहन मुंडावरे यांनी केले.