महसूल व पोलीस यंत्रणेचे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष
अमळनेर:- तालुक्यातील पांझरा काठ परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून महसूल व पोलीस विभागाच्या दुर्लक्षामुळे दिवसाकाठी शेकडो ब्रास वाळूची अवैध तस्करी सुरू आहे वाळू तस्करीकडे संबंधित विभाग मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा मुडी प्र. डांगरी येथील ग्रामस्थ करीत आहेत.
पांझरा काठावर नेहमी चोरटी वाळू वाहतूक सुरू असते मात्र गेल्या काही दिवसापासून परिसरातांत्रणेरस्करीला चांगलेच उधान आले आहे. कोणालाही न जुमानता ट्रॅक्टरच्या माध्यमातून माफियांकडून दिवसाकाठी शेकडो ब्रास वाळूची तस्करी करण्यात येत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. परिसरात सुरू असलेल्या तस्करीमुळे धुळे जिल्ह्यात व अमळनेर तालुक्यात मोठी वाहने रात्रीच्या वेळी वापरतात. पांझरा नदीचे काठ दोन्ही जिल्ह्यांना लागून असल्याने वाळू माफिया याचा फायदा घेतात. यंत्रणेतील अनेक जण दिवसभर वाळू माफीयांच्या सहवासात असल्याचे लपून राहिलेले नाही. यंत्रणेतील काही महाठग भागीदारीत ट्रॅक्टर घेऊन वाळू वाहतुकीत पार्टनर झाले आहेत.
तालुक्यात वावडे, जवखेडे, लोण भरवस मार्गे शेकडो ब्रास वाळूची अवैध वाहतूक होत आहे विशेष म्हणजे वाळू
वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरांना ऊत आला आहे. अवैद्य वाळू तस्करांना कोणाचीच भीती राहिली नाही.गाव-खेड्यांमधून भरधाव ट्रॅक्टरांना कोणी धावणाऱ्या हटकल्यास मुजोरीची भाषा वापरतात. कोणी त्यामुळे आमचे बिघडवू शकत नाही, असे धमकीवजा बोलले जाते. सुरू असलेल्या या वाळू तस्करी व ओव्हरलोड वाहतुकीमुळे परिसरातील चांगल्या रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. वाळू तस्करी जोमात असताना महसूल विभाग आणि पोलीस यंत्रणा कोमात गेल्याचे तस्करांना आळा घालणारा तरी कोण? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. पर्यावरणाचे नुकसान करण्यासह शासनाच्या महसुलावर दरोडा टाकणाऱ्या तस्करांना जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आवर घालावा अशी मागणी पांझरा काठ परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
वाळू रोखण्यासाठी असलेली भरारी पथके गायब…
तालुक्यातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा जोरात सुरू असल्याने वाळू चोरी रोखण्यासाठी तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली भरारी पथके स्थापन करण्यात आली होती. मात्र निवडणूकीच्या धामधुमीतच्या अनेक नद्यांमधील वाळू साठ्याचा लिलाव झालेला नसल्याने वाळू माफियांनी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरु केला आहे. अवैध वाळूच्या ओव्हरलोड ट्रॅक्टर मुळे तालुक्यातील रस्ते खड्डयात गेले आहेत.
प्रतिक्रिया…
सध्या तलाठी वर्गाचा कामावर बहिष्कार असून गावकऱ्यांनी ठरवून वाळू उचलू देऊ नये. गावकऱ्यांनी ही यंत्रणेसोबत येऊन लक्ष देणे गरजेचे आहे. – तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, अमळनेर
प्रतिक्रिया…
एका घटनेत तलाठ्याचा पाय तोडला आहे. त्यामुळे ते तलाठी यावर काम करायला तयार नाहीत यावर मार्ग काय निघतो. त्यानंतर कडक कारवाई करण्यात येईल. – नितीन मुंडावरे, प्रांताधिकारी अमळनेर