अमळनेर: येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संचलित प्रताप तत्त्वज्ञान केंद्र, अमळनेर येथील केंद्रात दि. 1 जानेवारी, 2025 रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षिणक धोरण 2020 या विषयावर PMUSHA- Soft Component अंतर्गत Workshops on NEP for Stakeholders या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे केंद्राचे मानद संचालक डॉ. दिलीप भावसार यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याबाबत विद्यार्थी, पालक व प्राध्यापक यांच्यातील सभ्रम दूर कावा तसेच आपल्या देशातील सर्व विद्यार्थ्यांना शिकण्याची सुविधा वाहविणे हे त्यांचे मुख्य उद्दीष्ट आहे, या दृष्टीने भारत सरकारच्या PMUSHA- Soft Component या योजनेअंतर्गत एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यशाळेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील विविध विषयांवर तज्ज्ञ मागदर्शक मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी कळविले आहे. सदर कार्यशाळेत दिवसभरात 4 सत्र होणार असून प्रथम साजात विज्ञान व तंत्रज्ञान विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठाचे प्रा. मंदार भानुरो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्याच्यौना संधी याविश्यावर मार्गदर्शन करणार असून द्वितीय सत्रात एम. ने. महाविद्यालय, जळगांव चे प्रा.डॉ. केतन नारखेडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 दृष्टी आणि परिणामांत्री समिक्षा या विषयावर तर तृतीय सत्रात जळगांव येथील सनदी लेखापाल श्री. विवेक काटपरे शैक्षणिक धोरण काल, आज आणि उद्या या विषावर मार्गदर्शन करीत तर चतुर्थ सत्रात कारला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगांवचे प्राचार्य उदय जगताप हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 तंत्रज्ञानाचा वापर आणि एकत्रिकरण याविषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदर कार्यशाळेसाठी अमळनेर शहर ग्रामीण परिसरातील महाविद्यालयीन विद्याची, पालक व प्राध्यापक यांत सहभागी नोंदवतील अशी माहिती केंद्रातर्फे देण्यात आली आहे.