अमळनेर:- माध्यमांनी प्रकाशझोत टाकताच सुखशांती अपार्टमेंट ते पिंपळे नाल्यापर्यंत अर्धा रस्ता कच्चा तयार केलेला होता. त्यांचे काम दि.९ रोजी रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून आधी धुळीने आणि उखडलेली खडी जीवावर बेतली होती. पिंपळे रस्त्यावर अद्याप फरशी पूल तयार झाला नाही मात्र त्यामुळे नागरिकांना तिकडून येता येत नाही. धड पिंपळे रस्ता ना ढेकूरोड कोणताही रस्ता वापरायला नाही. नागरिक इतर गल्लीमार्गे प्रवास करत पिंपळे नाल्यापर्यंत होते. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र लक्ष देईना अशी अवस्था झाली होती. शहरातील प्रमुख रस्ता असलेला ढेकूरोडवरील नागरिक दोन महिन्यांपासून धुळीने बेजार तर होते. आता उखडलेली खडी नागरिकांच्या जीवावर बेतली होती. कार, ट्रॅक्टर, ट्रक अशा वाहनांनी या उखडलेल्या खड्या उडून नागरिकांना जखमी करत आहेत. यामुळे हा रस्ता कधी होईल असे झाले होते.अखेर काम सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भुयारी गटार पूर्ण झालेली असून रस्ता होईना अशी परिस्थिती वाहनचालकांची अवस्था धुळ आणि उखडलेली खडीने त्रस्त झाली होती अखेर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे झाले आणि काम मार्गी लागले आहे.