अमळनेर:- आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव ,पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर, ग्रामपंचायत गांधली संयुक्त विद्यमाने आयोजित प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान साॅफ्ट काॅम्पोनन्ट अंतर्गत
PM USHA – Soft Component शेतकरी सहायता कार्यशाळा दि. 9 जानेवारी 2025 रोजी गांधली ता.अमळनेर या गावात घेण्यात आली. याप्रसंगी गावातील एकुण १२० शेतकरी उपस्थित होते.
उद्घाटन समारंभ प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोल दिलीपसिंग राजपुत व संचालक श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी ,उद्घाटन हस्ते नरेंद्र शिवाजीराव पाटील, सरपंच गांधली, प्रमुख अतिथी डाॅ. संदिप नेरकर ,सिनेट सदस्य यांची तसेच गावातील आदर्श शेतकरी सुधाकर साळुंखे, युवराज दगडु पाटील, माधवराव पाटील, दिनेश पवार, संजय पाटील, सरपंच पिलोदे भारती लोटन पाटील यांची उपस्थिती होती.
कार्यशाळेत चार सत्रात अविनाश खैरनार ,कृषी अधिकारी अमळनेर यांनी गावातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी विविध शासकीय योजना विषयी माहिती दिली. द्वितीय सत्रात आदित्य सावळे प्रकल्प व्यवस्थापक ,समग्र ग्रामीण व कृषी विकास प्रकल्प, केशव स्मृती प्रतिष्ठान जळगाव यांनी वनराई बंधारा बांधणे आणि पाणलोट क्षेत्र विकास यावर संवाद साधला. तृतीय सत्रात शेतकरी उत्पादक कंपनीची कार्यपद्धती या विषयावर तुषार पाटील ,सचिव राष्ट्र विकास ॲग्रो एज्युकेशन संस्था यांनी संवाद साधला चतुर्थ सत्रात शेती पूरक व्यवसाय या विषयावर दिपक संदानशिव प्रोजेक्ट मॅनेजर ,आधार संस्था यांनी माहिती दिली ,विशेष उपस्थिती दिलेले केशव स्मृती प्रतिष्ठान जळगांव प्रकल्प प्रमुख अनिल भोकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम समन्वयक प्रा.डाॅ.सागरराज चव्हाण, प्रा.डाॅ.जगदीश सोनवणे, प्रा.डॉ.भरत खंडागळे, प्रा.डी.आर. ढगे, प्रा.विजयकुमार वाघमारे, प्रा.डाॅ.अनिता खेडकर, प्रा. डाॅ.अस्मिता सरवैय्या,प्रा.डाॅ.श्वेता वैद्य यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.डाॅ.भरत खंडागळे व आभार प्रा.डाॅ.सागरराज चव्हाण, देवेंद्र सरदार, ईश्वर ठाकरे यांनी मानले.