श्री बद्रीनारायण संस्थेच्या वतीने आ.अनिल पाटलांचा विशेष सत्कार…
अमळनेर:- मतदारसंघात पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील अत्यंत प्रचलित असलेल्या श्री क्षेत्र बद्रीनारायन मंदिरासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी चार कोटी निधी मंजूर झाल्याने या बद्रीनारायन मंदिरास आता नवे रूप मिळणार आहे.
सदर यशस्वी प्रयत्नांबद्दल आ.अनिल पाटील यांचा श्री बद्रीनारायन संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाच्या विकासासाठी श्री क्षेत्र बद्रीनारायण मंदिर संस्थानसाठी 4 कोटी निधी मंजूर झाला आहे. यात पालकमंत्री सोबतच आमदार अनिल पाटील यांचे विशेष असे योगदान असल्याने श्री क्षेत्र बद्रीनारायण संस्थेच्या वतीने उपमुख्य ट्रस्टी गुलाबराव सहादू पाटील, ट्रस्टी आसाराम गोविंदा चौधरी ट्रस्टी दगडू सुकदेव महाजन,दामू अण्णा भोई, माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, सचिव देविदास वाणी, तसेच बहादरपूर सरपंच भिकन रामदास पारधी, उपसरपंच सुनील रघुनाथ वाणी, माजी उपसरपंच तथा सदस्य परेश हिरामण चौधरी, निंबा गिरधर भोई,प्रभाकर हरचंद भोई, राजेंद्र हरिश्चंद्र वाणी,किरण दगडू पवार, तसेच शिरसोदे सरपंच रमेश काशिनाथ सैंदाने,शालिग्राम बडगुजर,राकेश गुरव मा.ग्रा. सदस्य शांताराम जानकीराम पाटील,नूतन शिक्षण संस्था संचालक नंदकुमार वाणी, मोतीराम बोरसे, शंकर ताराचंद पाटील, हरचंद शामराव वाणी,कथू पुंजू भोई,अरुण मोतीलाल चौधरी,सुनील काटे आदींनी आमदारांचा विशेष सत्कार करत आभार मानले. दरम्यान सदर निधीमुळे या मंदिराचा मोठा विकास साधला जाणार असून यामुळे हे मंदिर भाविकांना आकर्षित करणारे ठरणार आहे.