
दर्शनासाठी पुरातन राम मंदिरात लागल्या भक्तांच्या रांगा…
अमळनेर:- अमळनेर शहरात दोन वर्षानंतर श्रीरामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली असून मारवड रोडवरील राम मंदिरात भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या

प्रताप कॉलेज समोरील मारवड रस्त्यावरील राम मंदिरात प्रताप शेठजींचे नातू महेश अग्रवाल व त्यांचा परिवार, यावेळी उपस्थित होते. शहरातील अनेक नागरिक शेकडोंच्या संख्येने श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यावेळी पुजारी सारंग कुलकर्णी, सेवेकरी महेंद्र परदेशी, सत्यवान महाजन, सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र चौधरी आदींनी सहकार्य केले. नगरसेवक नरेंद्र चौधरी यांच्या तर्फे भक्तांसाठी मोफत सरबतचे वाटप नागरिकांना करण्यात आले.







