अमळनेर:- शहरातील ताडेपुरा भागात बंद घरातून घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अमळनेर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
अमळनेर शहरातील धरणगाव रोड ताडेपुरा भागातील रेखा अनिल लांडगे यांच्या मालकीच्या बंद घरातुन २८ ते २८ जुलै २०२१ दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचे दरवाजा तोडुन कपाटातील ७,९४,५०० रुपये किमतीचे सोन्याचे चांदीचे दागिने व रोख रुपये असा ऐवज घरफोडी चोरी करुन नेला होता. त्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला भादवि कलम ४५७,३८० गुन्हा दिनांक २९ जुलै रोजी दाखल होता. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदरचा गुन्हा निलेश विनोद माछरे याने केला असल्याची माहीती मिळाली होती . त्यावरुन पोना मिलींद भामरे यानां सदर संशयितांवर पाळत ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. संशयीत निलेश माछरे याने त्याचे आई व पत्नीचे मदतीने काही सोने विकले आहे तसेच चोरीच्या पैशांनी मागील महिन्यात मोठ्या प्रमाणात नविन सोने खरेदी केले आहे अशी माहीती मिळाल्याने वरील गुन्हयात निलेश माछरे यास दिनांक ८/४/२२ रोजी अटक केली. त्याचा न्यायालयाने दिनांक १२/०४/२०२२ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिला असतानां त्याने सुरत वडोदरा येथील नेमाराम चौधरी या सराफ दुकानावर काही चोरी केलेले सोन्याचे दागीणे विक्री केल्याची कबुली दिली. त्यावरुन सराफ नेमाराम चौधरी यानीं ३० ग्रम वजनाची सोन्याची लगड १,५५,०००/- रुपये किमतीची समक्ष हजर केली आहे. तसेच चोरीतील पैसे व सोनाराकडील पैसे एकत्र करुन आई शितल विनोद कंजर व पत्नी प्रियका निलेश माछरे याचें मदतीने ३,५५,०००/ – रुपये किमतीचे नविन सोन्याचे दागीणे ए. के. ज्वेलर्स अमळनेर यांच्याकडून बनविल्याचे आरोपीने कबुल केले असुन त्यावरुन नमुद दोन्ही महिला सदर गुन्हयात अटक करुन त्याची न्यायालयाने दिनांक १२/०४/२०२२ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली होती. त्यांनी देखील गुन्हयाची कबुली देवुन चोरीचे पैश्यातुन नविन विकत घेतलेले सोन्याचे दागीणे पंचासमक्ष काढुन दिले आहेत. या प्रमाणे वरील गुन्हयात आता पावेतो गुन्हयातील चोरी गेलेले सोन्याचे दागीणे पैकी ४,२९, ४३१ रुपये किमतीचे ८५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व लगड असा माल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुढें, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे हे करत असुन त्यानां सदर गुन्ह्याच्या तपासात पोहेकाँ किशोर पाटील, पोना मिलींद भामरे, पोना सुर्यकात साळुंखे, पोना सिद्धांत सिसोदे यांनी मदत केली आहे. सदर आरोपीनां दि. ०९ ते १२ एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड न्यायालयाने दिली आहे .