
अमळनेर :- तालुक्यातील गोवर्धन येथील रहिवासी व बळीराम पाटील महाविद्यालय किनवट जि.नांदेड येथील प्रा. अनिल पाटील यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत भूगोल विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी किनवट तालुक्यातील आदिवासी लोकसंख्येवर संशोधन प्रबंध सादर केला असून त्यांचा संशोधनाचा विषय ” किनवट तालुक्यातील आदिवासी लोकसंख्येचा स्थलकाल सापेक्ष अभ्यास ” असून त्यांना विद्यापीठातील अधिष्ठाता डॉ. पराग खडके यांनी मार्गदर्शन केले तर डॉ. शिवाजी पाटील हे बाहय परीक्षक आणि भूशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. अविनाश कदम हे समितीचे चेअरमन होते.

प्रा.अनिल पाटील हे मूळ अमळनेर तालुक्यातील गोवर्धन येथील रहिवासी असून ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व असून त्यांनी बोर्ड परीक्षा, परीक्षक, नियामक, मुख्य नियामक, पेपर सेटर, बारावी पुस्तक समिक्षण, मुल्यमापन आराखडा, नविन अभ्यासक्रमाचे विभागीय साधन व्यक्ती, नविन शैक्षणिक धोरण-२०२० चे साधन व्यक्ती अशा अनेक क्षेत्रात त्यांनी काम केले असून ते कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असून संशोधनाचे कार्य केल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या यशाबद्दल माजी जि.प. सदस्य शांताराम बापू,डॉ. विजय पाटील, श्याम पाटील, बाबुलाल पाटील, ईश्वर महाजन ,डॉ. सी एन पाटील ,डॉ.बी एस पाटील, डॉ. एस बी पाटील ,प्रा. व्हि.डि.पाटील, प्रा.अनिल महाले ,प्रा. संजय बागुल, प्रा. प्रमोद पाटील ,प्रा.सतिष चौधरी, डॉ.संजय महाजन,प्रा.प्रदिप वाघ ,शिखर बँकेचे अधिकारी संजय पाटील ,ग्रामविकास शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी के. व्ही पाटील ,प्रा. अशोक पाटील, राजेंद्र सैंदाणे, नरेंद्र पाटील, भटू पाटील, संजय खैरनार इत्यांदी कडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
