
अमळनेर : बस मधून उतरतांना एका महिलेच्या पर्स मधील दीड लाखाचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना १७ रोजी दुपारी २ वाजता घडली.
पायल विनोद रावलानी (रा शांतीनगर चाळीसगाव) या आपल्या मुलीसोबत चुलत बहिणीच्या मुलीच्या लग्नाला १७ रोजी अमळनेर आल्या. दुपारी २ वाजता त्या अमळनेर बसस्थानकावर उतरत असताना त्यांच्या पर्स ची चेन उघडून अज्ञात चोरट्याने पर्स मधील ४० ग्रॅम सोन्याची माळ १० ग्रॅम सोन्याची अंगठी , आणि २ हजार रोख व लॉकर ची चाबी असा एकूण १ लाख ५२ हजार रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबत पायाल रावलाणी यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.