
अमळनेर:- येथील नगरपरिषदेतर्फे १७ रोजी प्लास्टिक बंदी बाबत कारवाई करण्यात आली. यात सिंगल युज प्लास्टिक पासून बनवलेले सजावटीचे वस्तू विक्री केल्याकारणाने दोन दुकानदारांना एकूण २००० रुपये दंड ठोठावला. पथकाने एकूण 9 किलो प्लास्टिक जप्त केले . कारवाई शुक्रवारी सकाळी करण्यात आली.अमळनेर नगरपरिषदेच्या प्लास्टिक विरोधी पथकाकडून प्लास्टिक बंदी अभियानात सातत्य राखत शुक्रवारी शहरातील न्यू प्लॉट परिसरातील मनोज गिफ्ट, अनमोल गिफ्ट शॉपी येथे बंदी असलेल्या प्लास्टिक पासून बनवलेले सजावटीचे वस्तू विक्री करताना आढळून आल्याने कार्यवाही करण्यात आली. यात मनोज गिफ्ट, अनमोल गिफ्ट शॉपी यांनी बंदी असलेल्या प्लास्टिक पासून बनवलेले सजावटीचे वस्तू साठवणूक व विक्री केल्याबद्दल २०००/- आकारण्यात आला.
नगरपरिषद मुख्याधिकारी वेवोतोलू केजो (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॉस्टिक बंदी करत कारवाई करताना पालिकेचे स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे तसेच शहर समन्वयक गणेश गढरी , पथक कर्मचारी ,शामराव करंदीकर , योगेश पवार, यूनूस शेख, महेंद्र बिराडे, अनंत सनंदानशिव, सतीश बिराडे यानीही कार्यवाही केली. दरम्यान मुख्याधिकारी यांनी सर्व नागरिकांना प्लास्टिक कॅरीबॅग यांचा वापर न करण्याचे व कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे व आपला परिसर स्वच्छ, सुंदर व हरित ठेवण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.