
मंगळग्रह सेवा संस्थेचे विशेष सहकार्य : कोंडाजी व्यायाम शाळेचा स्तुत्य उपक्रम
अमळनेर : येथील कोंडाजी युवक मंडळ संचलित कोंडाजी व्यायाम शाळा यांच्यातर्फे मकरसंक्रांती निमित्ताने आयोजित विराट कुस्त्यांच्या खुल्या दंगल स्पर्धेत मंगळग्रह सेवा संस्थेचा सेवेकरी तथा पहेलवान सिद्धेश अहिरे याने धुळे येथील बंटी मरसाळे याला चित करत प्रथम क्रमांकाने विजयी झाला.
बोरी नदी पात्रात आयोजित या दंगलीत तालुक्यासह जळगाव, धुळे, संभाजीनगर, चाळीसगाव, मालेगाव येथील कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या कुस्त्यांच्या दंगलीत महिला कुस्तीपटूंनीही सहभाग घेतला होता.
यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, पोलीस निरीक्षक विकास देवरे, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, माजी नगरसेवक विक्रांत पाटील, माजी नगराध्यक्ष प्रभाकर पाटील, भूषण भदाणे, सुंदरपट्टीचे माजी सरपंच सुरेश पाटील, माजी नगरसेवक संजय पाटील, माजी सरपंच प्रल्हाद पाटील, पत्रकार जयेशकुमार काटे, पत्रकार उमेश काटे, पत्रकार राहुल बहिरम आदींची विशेष उपस्थिती होती.
विजेत्यांना भांडी, ट्रॉफी, रोख हजार ते पाच हजार रुपये पर्यंतचे बक्षीसे देण्यात आली. या साठी माजी नगरसेवक संजय कौतिक पाटील, नरेंद्र पाटील, विजय पाटील, संजय भिला पाटील, ज्ञानेश्वर गंगाराम पाटील, मनोज देवरे, शिवा पाटील, भगवान पाटील आदींनी परिश्रम घेतले. राजू पहेलवान, विठ्ठल पहेलवान, दिगंबर पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले.
पहेलवानवान सिद्धेश अहिरे याच्या यशाबद्दल मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी तथा मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी, जयेंद्र वैद्य तसेच तालुक्यातील सर्व स्तरावरील मान्यवरांनी कौतुकाचा वर्षाव केला.