![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2025/01/30_08_2024-14_02_2024-compassionate_appointment_23653126_23788185.jpg?fit=1024%2C576&ssl=1)
प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना वय बाद होण्याची भीती !
अमळनेर : सहा सहा वर्षे उलटून ही जिल्हापरिषदेतील अनुकंपा धारकांना नोकरी मिळत नसून वय वाढत असल्याने सेवाजेष्ठतेतून बाद होण्याची भीती उमेद्वारांमध्ये आहे. जिप मुख्याधिकारी आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन तात्काळ नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.
![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2024/12/gif_1734710466943-1.gif?resize=640%2C768&ssl=1)
मयत आई किंवा वडिलांच्या जागेवर अनुकंपा नोकरीसाठी प्रतीक्षा यादीतीतील उमेदवारांना पाच ते सहा सहा वर्षे होऊन गेली तरी अनुकंपावर नियुक्ती मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. काहींचे आई आणि वडील दोघे मयत झाल्याने त्यांना जगणे देखील असह्य झाले आहे. जळगाव जिल्ह्यात डिसेंबर २०२४ च्या यादीनुसार १५५ उमेदवार प्रतीक्षेत आहेत. उमेदवार आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. वयोमर्यादेत नोकरी नाही मिळाली तर आयुष्य उध्वस्त होण्याची वेळ येईल म्हणून प्रवीण ठाकरे (प्रतीक्षा यादी क्रमांक ३९) ,सागर पाटील (४५),अक्षय बाविस्कर (४७),मंगेश मदने (७४),अनिकेत बिराडे (७६),सदिया खान कुरेशी (९०) ,आनंद बाविस्कर (९९),सार्थक पाटील (१०१),सौरभ पाटील (१०८) यांनी जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील , मंत्री गिरीश महाजन , मंत्री संजय सावकारे , आमदार राजू मामा भोळे , आमदार मंगेश चव्हाण , आमदार चंद्रकांत सोनवणे याना निवेदनाद्वारे दखल घेण्याची मागणी केली आहे.
प्रतिक्रिया
माझे नाव गेल्या सहा वर्षांपासून जळगांव जिल्हा परिषद अनुकंपा प्रतीक्षा यादीत आहे अजुनही मला नियुक्ती मिळाली नसल्याने माझ्या कुटूंबाला आर्थिक,मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.तरी लवकरात लवकर अनुकम्पा उमेदवारांची नियुक्ती व्हावी ही अपेक्षा.
महेंद्र लखीचंद कुमावत
(प्रतीक्षा यादीतील उमेदवार)
माझ्या वडिलांचे अचानक निधन झाल्याने आमच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.तरी अशा परिस्थितीत आम्हाला जळगांव जिल्हा परिषद अनुकम्पा तत्वावर लवकरात लवकर नोकरी मिळायला पाहिजे.
मंगेश नरेंद्रकुमार मदने (प्रतीक्षा यादीतील उमेदवार)
![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2025/01/image_editor_output_image1945045255-17373389785377574354205967647335.jpg?resize=640%2C815&ssl=1)