![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2025/01/Water.png?fit=480%2C320&ssl=1)
नोटीस बजावून थकबाकी न भरल्यास जप्तीची मोहीम
अमळनेर:- पालिका हद्दीतील हद्दीतील मालमत्ता धारकांनी २०२४-२५ या आपली घरपट्टी पाणीपट्टी त्वरित भरून सहकार्य करावे अस आवाहन मुख्याधिकारी नेरकर यांनी केले आहे. आर्थिक वर्षाच्या अखेर घेणे असलेल्या पाणीपट्टी करावर २% दंड आकारण्यात येत आहे. तसेच मुदतीत मालमत्ता कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकास महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत, औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ ची कलम १५० (अ व क) अन्वये दरमहा २% शास्ती आकारण्यात येईल. तसेच महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत, औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५२ अन्वये जप्तीचे अधिपत्र काढण्यात येईल व स्थावर, जंगम मालमत्ता जप्त करण्यात येईल व नळ संयोजन खंडित करण्यात येईल. तसेच घरपट्टी, पाणीपट्टी व नगरपरिषद शॉपिंगचे भाडे व मालमत्ताकर घेणे असलेल्या मालमत्ता धारकांचे नावे चौका चौकात फलक लावणेत येतील तसेच वर्तमान पत्रात नावे जाहीर करण्यात येईल व त्याकामी येणारा खर्च संबधित मालमत्ता धारकांकडून वसूल करण्यात येईल. तसेच थकीत मालमत्ता कर धारकांच्या मालमत्तेवर नगरपरिषदेचा बोजा चढविण्याची कार्यवाही करण्यात येईल येईल अशी माहिती नेरकर यांनी दिली आहे. तरी वरील कटू प्रसंग टाळण्यासाठी नागरिकांनी आपल्याकडे असलेले सन
२०२४-२५ अखेरची घरपट्टी, पाणीपट्टी चालू व थकीतसह रक्कम तात्काळ पालिकेस सहकार्य करावे व कार्यालयात भरणा करावा असे आवाहन केले आहे.
![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2024/12/gif_1734710466943-1.gif?resize=640%2C768&ssl=1)
वसुलीसाठी पथके नियुक्त – वसुलीसाठी १० पथके नियुक्त करण्यात आले आहेत थकबाकीदारांना आधी नोटीस दिली जाणार आहे. तरीही भरणा न केल्यास जप्तीची कारवाई करण्यात येईल यासाठी सर्व नागरिकांनी आपली थकबाकी अथवा चालू वर्षाचे कर भरणा त्वरित करून पालिकेला सहकार्य वसुलीसाठी ८ पथकांची नियुक्ती करण्यात आली. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी नेरकर यांनी सांगितले.
![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2025/01/image_editor_output_image1945045255-17373389785377574354205967647335.jpg?resize=640%2C815&ssl=1)