
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व राज्यशास्त्र विभाग आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी आणि तहसीलदार साहेब अमळनेर, यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विभागीय ‘वक्तृत्व स्पर्धेचे’आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले हे होते. या वक्तृत्व स्पर्धेत प्रताप महाविद्यालय अमळनेर, शासकीय आयटीआय अमळनेर,बी एड कॉलेज अमळनेर आणि कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले मत व्यक्त केले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. डॉ. दिलीप कदम, प्रा. डॉ.सतीष पारधी यांनी कार्य केले .सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. माधव वाघमारे यांनी तर सूत्रसंचालन कु. नाजमीन खान पठाण हिने केले . याप्रसंगी मंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही. डी .पाटील सर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार कोमल पाटील या विद्यार्थिनींनी मानले व राष्ट्रगीताने ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न आली.