
अमळनेर : येथील बस स्थानकात चालक दिनानिमित्त सुशोभिकरण करून रांगोळी काढून चालकांचे अभिनंदन करण्यात आले. रा.प. आगारातील फलकावर चालक दिनानिमित्त सर्व चालक बंधूना शुभेच्छा देण्यात आले. चालकांचे अभिनंदन बॅनर आगार प्रमुख कार्यालयासमोर, बसस्थानक चौकशी कक्ष, पारोळा बसस्थानक येथे प्रदर्शित करण्यात आले.आगार प्रमुख प्रमोद बळीराम चौधरी यांच्या
हस्ते सदर कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. उत्कृष्ट केपीटीएल देणारे ०५ चालक, विना अपघात सेवा देणारे ०५ चालक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. श्रीमती भारती बागले,वाहतूक निरीक्षक अनिकेत न्हाळदे, मुकेश सैंदाणे, तुषार पाटील, कु. आशाबाई लांडगे, सोनाली धनगर, श्रीमती कविता चव्हाण, राकेश चौधरी, भारत पाटील, जिजाबराव वानखेडे, सुरेश पाटील, रामदास चौधरी, दैवत पाटील, गणेश पाटील, आय.एस. अन्सारी हे चालक-वाहक, प्रशासन कर्मचारी उपस्थित होते. संगणक उद्घोषणा यंत्रणेद्वारे व कर्तव्यावरील वाहतूक नियंत्रक
यांच्याद्वारे उद्घोषणा करून चालक बंधूना चालक दिनाच्या शुभेच्या देण्यात आल्या.सदर कार्यक्रम प्रसंगी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रा.प. महामंडळ यांचा चालकांसाठी संदेश असणारे आवाहन पत्रकाची प्रत आगारातील चालकांस देण्यात आली. तसेच आगार प्रमुखांनी सर्व चालकांना चालक दिनाच्या शुभेच्छा देऊन सदर कार्यक्रमाची सांगता केली