
अमळनेर- भारतात कुठलाही चित्रपट थिएटर मध्ये प्रदर्शित करायचा असेल तर त्याला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे . भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्ड अर्थात सेन्सॉर बोर्डाचा कारभार चालतो .
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण (इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग ) मंत्रालयातर्फे सेन्सॉर बोर्डाच्या सल्लागार समिती सदस्य पदी अमळनेर येथील शैलेश चुडामण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कै.चुडामण केशव पाटील(सी. के.पाटील)निवृत्त सहायक निबंधक (AR) यांचे ते चिरंजीव तर योगेश पाटील यांचे बंधू आहेत.अनेकविध क्षेत्रात गती असलेले,चिकित्सक व उच्च आकलन क्षमता असलेले शैलेश पाटील सध्या मुंबई येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील व खासदार स्मिताताई वाघ व सर्व मित्रपरिवारातर्फे शैलेश पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.