![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2025/01/IMG-20250129-WA0010.jpg?fit=1024%2C461&ssl=1)
अमळनेर – 27 जाने. रोजी अमृतसर येथील एका माथेफिरूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर चढून लोखंडी हातोडीने पुतळ्याचे नुकसान करून विटंबना केल्याप्रकरणी अमळनेर येथील विविध संघटना व समाज बांधवातर्फे तीव्र निषेध व संताप व्यक्त करून उपविभागीय अधिकारी यांना सदर माथेफिरुवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2025/01/1002687504.gif?resize=640%2C768&ssl=1)
सदर निवेदनावर सामाजिक परिषदेचे नरेंद्र संदानशिव, नगरपरिषद नाशिक विभागाचे अध्यक्ष सोमचंद संदानशिव, आरपीआय आठवले गटाचे यशवंत बैसाणे, ऍड अभिजित बिऱ्हाडे, महाराष्ट्र सफाईगार संघटनेचे अध्यक्ष अनिल बेंडवाल, मागासवर्गीय प्राध्यापक संघटना जिल्हा सचिव डॉ. राहुल निकम, प्रा. डॉ. विजय खैरनार, प्रज्ञाशील सैंदाणे, जानवे येथील पितांबर वाघ, मंगरूळ चे अरुण घोलप, बौद्धचार्य बापूराव संदानशिव, दिनेश बिऱ्हाडे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायकवाड, विनोद बिऱ्हाडे, चंद्रकांत संदानशिव, भरत सोनवणे, अरविंद संदानशिव, राजेंद्र संदानशिव, किरण संदानशिव, दीपक सोनवणे, संजय संदानशिव, अर्जुन गढरे, संजय बिऱ्हाडे आदीच्या सह्या आहेत