
अमळनेर:- तालुक्यातील अंतुर्ली येथे गावठी दारू विकणाऱ्या इसमावर मारवड पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सपोनि जयेश खलाने यांना मिळलेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोहेकाँ सुनील अगोणे, पोहेकाँ विशाल चव्हाण, होमगार्ड भील यांनी अंतुर्ली येथे भेट दिली असता अंतुर्ली ते तासखेडा पूलच्या दरम्यान झाडा झुडपाच्या आडोश्याला अनिल अशोक भील हा प्लास्टिकचा कॅन घेवून बसलेला दिसून आला. छापा टाकला असता पोलिसांची चाहूल लागल्याने सदर इसम झाडाझुडपातून पळून गेला. त्या ठिकाणावरून १२०० रुपये किमतीची गावठी दारू मिळून आली. नमुने घेवून उरलेल्या मालाचा जागीच नाश करण्यात आला. मारवड पोलीसात मुं.प्रो. ॲक्ट ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो विशाल चव्हाण हे करीत आहेत.




