
अमळनेर:- तालुक्यातील सबगव्हाण येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली असून एक जागा रिक्त राहिली आहे.
एकूण १३ जागांसाठी १४ अर्ज आले होते, त्यात दोन जणांनी माघार घेतल्याने इतर उमेदवारांची निवड बिनविरोध झाली. मात्र एका अनुसूचित जमाती राखीव जागा अर्ज न आल्याने रिक्त राहिली आहे. बिनविरोध निवड झालेल्या संचालकात सचिन पाटील, सूर्यकांत पाटील, भरत पाटील, तुकाराम पाटील, भगवान पाटील, भाऊसाहेब पाटील, सतीलाल पाटील, भटू पाटील, अनिता पाटील, जयश्री पाटील, व डॉ. अविनाश पाटील यांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी माजी सरपंच नरेंद्र पाटील, विकासो चेअरमन प्रफुल्ल पाटील, अशोक पाटील, विनायक पाटील, श्रीराम पाटील, सतीलाल पाटील, शशिकांत पाटील, मच्छिंद्र पाटील, दगडू पाटील, ज्ञानेश्वर पाटील, पृथ्वीराज पाटील, साहेबराव आबा, मोतीलाल पटल, विठ्ठल पाटील, रमेश पाटील, डॉ. सुनील बोरसे, नितीन पाटील, लक्ष्मण अप्पा, सखाराम पाटील यांनी सहकार्य केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजू पाटील, वारुळे, विजय अप्पा यांनी काम पाहिले.