
अमळनेर:- तालुक्यातील धानोरा येथून २८ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद मारवड पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, २८ रोजी दुपारी सदर महिलेचा पती घरी आला असता त्याला त्याची पत्नी दिसली नाही. त्याने मुलांना विचारले असता, मुलांनी सांगितले की, आई सकाळी १० वाजताच गावातून जाऊन येते असे सांगून बाहेर गेली आहे. सदर महिलेच्या पतीने आजूबाजूच्या परिसरात व सासरी शोध घेतला मात्र कोणताही तपास न लागल्याने त्याने मारवड पोलिसांत धाव घेत बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे. पुढील तपास हेकॉ संजय पाटील हे करीत आहेत.