
अमळनेर : दूध घ्यायला गेलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातून दोन अज्ञात मोटरसायकल स्वारांनी दीड तोळ्याची सोनसाखळी चोरून नेल्याची घटना २९ रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली.

अल्काबाई सुभाष लोहार वय ५९ रा प्रताप मिल कंपाऊंड ही महिला सायंकाळी दूध घेण्यासाठी मंगलमूर्ती चौकात गेली होती. घराकडे परतत असता दोन मोटरसायकलस्वार तिच्या घराकडून जोरात येत त्यांनी तिच्या गळ्यातून १४.५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन ओढून ते गावातील पेट्रोलपंपाकडे पळून गेले. महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.