
अमळनेर:- महाराष्ट्र राज्य ज्यूदो असोसिएशन व पुणे जिल्हा ज्यूदो असोसिएशन, यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री.शिवछत्रपती क्रीडा संकुल,म्हाळूंगे- बालेवाडी पुणे येथे 22, ते 24 एप्रिल दरम्यान स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा ज्यूदो हौशी असोसिएशन, जळगांव तर्फे 15 एप्रिल शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता अमळनेर, येथे निवड चाचणीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या निवड चाचणीतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगांव जिल्हा संघाची निवड करण्यात येईल . सदर स्पर्धेत सहभागासाठी वर्ष 2002 ते 2007 मध्ये जन्मलेले आणि 15 वर्ष पूर्ण आणि 21 वर्षांखालील मुले आणि मुली खेळाडू सहभाग घेवू शकतात. त्यासाठी आवश्यक कागदपत्र जन्म दाखला, आधार कार्ड, बोनाफाईड व 2 फोटो घेऊन उपस्थित राहावे. तरी या स्पर्धेच्या निवड चाचणी साठी स्थळ सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल, MSEB सब स्टेशन जवळ, धुळे रोड, मंगरूळ,अमळनेर हे असून जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थित राहावे असे आवाहन विष्णूभाऊ भंगाळे,सचिव प्रा.उमेश पाटील, यांनी केले आहे
आधिक माहिती साठी अजय काशिद 9890793790, 9021779190 व सचिन वाघ 9890204008 यांच्याशी संपर्क साधावा.







