भट्टी उध्वस्त करत आरोपीस घेतले ताब्यात…
अमळनेर:- तालुक्यातील हिंगोणे बु. येथे गावठी दारूच्या भट्टीवर मारवड पोलिसांनी कारवाई करत एकास अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,हिंगोणे बु. येथे गावठी दारू भट्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्याने सपोनि जयेश खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना सुनील तेली, पोहेकॉ विशाल चव्हाण, पोहेकॉ सुनील आगोने, पोहेकॉ संजय पाटील यांनी हिंगोणे बु. गावात भेट दिली असता वसंत काशिनाथ भील हा त्याच्या घराच्या मागील बाजूस नाल्याच्या शेजारी जीवंत पेटती हातभट्टी, दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन, तसेच १५ लिटर गावठी दारू आदी साहित्यासह आढळून आला. सदर ठिकाणावरून नमुने घेवून सदर साहित्याचा नाश करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. व याप्रकरणी मारवड पोलीसात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९कलम ६५(फ, ब, क, ई) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.