आरोपीवर परराज्यातही वेगवेगळ्या चोऱ्यांचे गुन्हे दाखल…
अमळनेर:- तालुक्यात अनेक गावात ग्राम सरंक्षक पथके स्थापन करण्यात आले असुन त्यानुसार दि. २७ मार्च रोजी मंगरुळ येथील रात्रगस्तकामी असणारे ग्राम सरंक्षण पथकास एक संशयित मिळुन आला होता. सदर पथकातील सदस्यांनी लागलीच पोलीस वाहनास फोन करुन त्याबाबत दिली असता पोलीस वाहन तात्काळ सदर ठिकाणी पोहचले. त्यांनतर पोलीस वाहनांस पाहताच संशयित इसम बेसावध ग्राम सरंक्षक पथक सदस्याच्या हाताला झटका देवुन पळुन गेला होता. परंतु त्यापुर्वी सदर संशयिताचा फोटो काढण्यात आला होता. त्यावरुन अमळनेर पोलीस सदर संशयिताचे मागावर असतांना तो प्रशांत जगन वारडे रा.गोरगावले ता.चोपडा अशी प्राथमिक माहीती मिळाली होती. त्याच आधारावर सदर संशयित इसमाचा शोध सुरु होता. परंतु सदर संशयित हा अट्टल चोर असल्याने तो नियमित त्याचे वास्तव्याचे ठिकाण बदलत होता. दि २८ मार्च रोजी पो.नि. जयपाल हिरे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, वरील घटनेतील संशयित हा सुरत राज्य गुजरात येथे लपुन बसला आहे. त्यावरुन लागलीच पोना मिलींद भामरे , पोना सुर्यकांत साळुंखे , पोकाँ निलेश मोरे अश्यांचे पथक तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करून तात्काळ सुरत येथे रवाना केले व सदर संशयित इसमास कडोदरा पोलीसांच्या मदतीने अत्यंत शिताफिने ताब्यात घेवुन अमळनेर पोलीस स्टेशन येथे परत आले. सदर संशयित इसमास पो.नि. श्री . जयपाल हिरे यांना विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतुन भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्ह्यांतील चोरी केलेली हिरो होंडा पँशन प्रो मोटारसायकल क्र.एम.एच .१९ ए.डब्ल्यु ९२०३ काढुन दिली असुन त्यास अधिक विचारपुस करता त्याने ०३ मोटर सायकल, ०३ लॅपटॉप, ०१ चार्जर, ९ अँण्ड्रॉईड व साधे मोबाईल, ०२ पितळी समई, शटर फोडण्याचे कटर आदी साहित्य काढून दिले. आरोपी नामे प्रशांत जगन वारडे वय. २६ यास भा.द.वि कलम ३७ ९ प्रमाणे गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीकडुन अमळनेर पो.स्टे. कडील ०१ गुन्हा, चोपडा शहर पो.स्टे . कडील ०४ गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर आरोपीतांवर यापुर्वी चोपडा शहर पो.स्टे . व सुरत राज्य गुजरात येथे बरेच गुन्हे दाखल असल्याचे समजुन येत आहे. तसेच सदरचे गुन्हा उघडकीस आणणेकामी पो.नि. जयपाल हिरे यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोहेकाँ शरीफखान पठाण, पोना मिलींद भामरे, पोना सुर्यकांत साळुंखे, पोना सिध्दांत सिसोदे, पोकाँ निलेश मोरे यांनी सदरची कामगिरी केली आहे.