
अमळनेर:- कृषी कॉलनीत २ महिन्यापासून पथदिवे बंद आहेत याबाबत स्थानिक नागरिकांच्या तक्रारी करूनही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे नागरिक रोष व्यक्त करीत आहेत.

कृषी कॉलनी ही मध्यवर्ती वसाहतीत ४० वर्षांपासून जुनी कॉलनी आहे. मात्र त्याठिकाणी रात्री अंधाराचे साम्राज्य आहे. तसेच कुत्र्यांचा प्रचंड त्रास असून रात्रीच्या वेळी सरपटणारे प्राणी निघत असल्याने नागरिक भितीत वावरत असतात. गेल्या दोन महिन्यांपासून पथदिवे बंद असूनही ही समस्या सोडवायला माजी, भावी नगरसेवक सुद्धा उत्सुक नाहीत. त्यामुळे नागरिकांना नियमित कर भरून देखील सुविधा उपलब्ध होत नाही हे दुर्दैव आहे. त्यामुळे नागरिकांची किरकोळ समस्या देखील सुटेनासी झाली आहे.
प्रतिक्रिया…
गेल्या २ महिन्यांपासून पथदिवे नसल्याने आम्ही रात्री फिरायला येतांना अंधार असतो. स्थानिक नागरिक बाहेरचे दिवे लावतात पर्यायाने दोन महिने उलटून सुद्धा विद्युत विभागाला जाग येत नाही. आम्ही वेळेवर कर भरणा करतो. मात्र सुविधा मिळत नाही. – दिलीप पाटील, नागरिक
प्रतिक्रिया…
तक्रार आली की दोन दिवसांत सोडविण्यात येते मात्र ठीक आहे. आजच कर्मचारी पाठवून सदर दिवे बंद आहेत ते सुरू करण्यात येतील याबाबत लवकरात लवकर तक्रार द्यावी. कुणाल महाले, विद्युत अभियंता