
अमळनेर:- तालुक्यातील आदर्शगांव सुंदरपट्टी येथील जि. प. शाळेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे लोकनियुक्त सरपंच सुरेश अर्जुन पाटील हे होते. अध्यक्ष व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमप्रंसगी शाळेचे मुख्या. संजय जगताप, केंद्रप्रमुख विश्वास पाटील, ज्येष्ठ शिक्षिका जयश्री बारड मॅडम, ज्येष्ठ शिक्षिका श्रीम. स्मिता सोनवणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या जीवनातील प्रसंग व घडामोडी सांगितल्या. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात सरपंच सुरेश पाटील यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. डॉ. बाबासाहेबांनी बहुजन समाजासाठी केलेले कार्य तसेच देशासाठी दिलेले योगदान याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक भालेराव पाटील, आधार पाटील, वना पाटील, गोपाल पाटील, अंगणवाडी सेविकाताई, मदतनीस ताई शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन विश्वास पाटील सर यांनी केले. आभार संजय जगताप सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बारड मॅडम व श्रीम. सोनवणे यांनी परिश्रम घेतले.







