
प्रताप महाविद्यालयात झाले उद्याचा भारत घडविताना याविषयावर व्याख्यान
अमळनेर – येथील प्रताप महाविद्यालय फार्मसी महाविद्यालय व रुसा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानास शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे तासभर चाललेल्या व्याख्यानादरम्यान लेखक अच्युत गोडबोले यांना उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

उद्याचा भारत घडविताना या विषयावर विचार मांडत असताना आपल्या जीवनाची माहिती दिली. इंग्लिश लिटरेचर कसे शिकलो. पुस्तके कसे लिहिली? मी कोणत्याही विषयाचा तज्ञ नाही असे सांगून मी विद्यार्थी आहे. मला वाईट वाटते, शिक्षक अजूनही विद्यार्थी राहिलेले नाहीत. शिक्षकांनी दर क्षणाला विद्यार्थी म्हणूनच जगल पाहिजे. कुतुलानेच मी लिहीत गेलो. कुतुलानेच मला प्रचंड जिवंत केलं.माणूस जेव्हा निर्माण झाला त्यावेळी इंद्रधनुष्य,समुद्र भारती ओहटी असेल, सूर्य उगवत मावळत असेल, ज्वालामुखी, भूकंप असेल त्यावेळी माणसाला का? हा प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारल्यानंतर तो उत्तर शोधत गेला.ते शोधता- शोधता त्याने विज्ञानाचा विकास केला त्या विज्ञानाला आपलं आयुष्य सुखकर करण्यासाठी वळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तंत्रज्ञान निर्माण झाले. त्यानंतर माणसाने एकत्र राहण्याला सुरुवात केली त्यातून समाजशास्त्र, अर्थशास्त्र,मानसशास्त्र, तत्त्वज्ञान अनेक अशा ज्ञान शाखा निर्माण झाल्या आणि माणसाने आपल्या आयुष्याचा अर्थ शोधायला सुरुवात केली.त्यावेळेला संगीत,साहित्य,चित्रकला, शिल्पकला पण निर्माण केल्या.पण या सर्व कशा निर्माण झाल्या पाहिजे? याचा मुख्य शिलेदार कोण होते,आपल्या नंतर हे सर्व कळलं पाहिजे. हे मला पहिल्यापासूनच वाटायचं. म्हणजे कुतुहूल आहे.त्याने कधीही मला शांत बसू दिले नाही. नुसता परीक्षेपुरता अभ्यास कधी जमला नाही. ही पृथ्वी, हा माणूस,सजीव निर्जीव,निसर्गहीच परीक्षा हेच चित्र पाहिले. तेव्हा माणूस माणसाने निर्माण केला. या संस्था आपण शिकलं पाहिजे. ज्यांनी यासाठी योगदान दिले ते माणसे कशी होती. त्यांची तत्वे काय होती.आपल्याला कुशल होणे शक्य नाही किमान त्याची मूलतत्त्वतरी कळली पाहिजे. म्हणून मी सातत्याने त्यामागे लागलो. त्यामध्ये अनेक लोकांनी अवघड विषय सोपे करून सांगितले. तसे आपल्याला करता येईल का? वास्तविक जगात हजारो पुस्तके आहेत. पण ते मराठीमध्ये वेगवेगळ्या अर्थाचे ज्ञान सोप्या भाषेत आणता येईल का? त्यामुळेच मी पुस्तके लिहायला लागलो. वेगवेगळ्या विषयावर आदिमानवापासून ते मंगळावर स्वारी अशी सर्व पुस्तके लिहिली. ते सोप्या भाषेत मांडतो.त्यामुळे ते लोकांना आवडते.पण हे घडलं कसं. माझा जन्म अमळनेरचा उन्हाळ्यात अमळनेरला आलो की हिंडायचो फिरायचं सिनेमा बघायचो. घरात पनिशमेंट नव्हती. त्याच्यापेक्षाही विश्व त्याचे कुतुहूल.साहित्य, चित्रकला, संगीत हे किती छान आहे हे शोधत जाणे. परीक्षेकरीता अभ्यास केलाच नाही पण पहिली ते आयआयटीपर्यंत एकही वर्ग गेला नाही. वडील गणित गणिताचे प्राध्यापक असल्याने गणिते ही तीन-तीन वेगवेगळ्या पद्धतीने सोडवण्याची स्पर्धा असायची.कधी वडील जिंकायचे तर कधी मी. विज्ञानाची आवड कशी लागली त्यावेळी शिक्षकांनी कसे शिकवले विज्ञान शिक्षक व भूगोल शिक्षक यांच्या त्यांनी गमती सांगितल्या. इंग्रजी शिकताना आपण मराठी विचार करतो मग ट्रान्सलेट करतो. तर तसे नाही म्हणून जे करायचे ते इन्स्टंट करायचे म्हणून मी दहा महिने इंग्रजी वाचनातून शिकलो. माझ्या आयुष्यात दोन टर्निंग पॉईंट आहेत आयआयटी टॉपर यांच्याशी संपर्क आला.माझी खोली सर्व प्रकारच्या पुस्तकांनी भरलेली होती. मुलाच्या आजाराने मला व्यसनापासून बाहेर काढले. त्यावेळी मला जे येत नव्हते ते मी नऊ ते पाच ऑफिस करून वाचन केले.वाचन रात्री दोन ते सकाळी आठ पर्यंत वाचन चालायचे. नंतर खूप पुस्तके लिहिली. विविध देश पिंजून काढले.त्यातून शिकलो.युरोप जपान इथे ऑफिस काढली. 23 वर्षे सीईओ होतो.जगभर एल अँड टी चे सहा ऑफिस काढली. विदेशात हजारो मुलं पाठवले.आपली ओळख काय?बंगला, गाडी यात मला रस नव्हता. तुम्ही काय केलं याला महत्त्व नाही. तुमच्याकडे काय आहे, यापेक्षाही तुम्ही काय आहात याला महत्त्व आहे. असे मी मानले.मानवतावादी, विज्ञानवादी, समतावादी, स्त्री पुरुष, धर्म,जात,साने गुरुजींची शिकवण अशी माझी ओळख झाली तर मला आवडेल. या सर्व ज्ञान शाखेतील आपण शिकून घ्यावे व ते सर्व मराठीतून आणावे.म्हणून या लिखाणाला सुरुवात केली. शास्त्रज्ञांनी मला खूप भुरळ घातली त्यावेळी चार्ली चापलीन, आईन्स्टाईन यांची त्यांनी उदाहरणे दिली.बिग बँग,पाणी, काँटम्स वाचकांना यावर पुस्तके वाचायला आवडतील.सर्व ज्ञान शाखांची मराठी ओळख करून देणे,मराठी ज्ञान भाषा होण्यासाठी प्रयत्न करत राहील असे त्यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितले. विविध प्रश्न विचारले.शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष व खान्देश शिक्षण मंडळाचे कार्योपाध्यक्ष सी.ए.नीरज अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालक हरी भिका वाणी,योगेश मुंदडे,प्रदीप अग्रवाल, विश्वस्त वसुंधरा लांडगे,प्राचार्य डॉ.ए.बी.जैन, फार्मसीचे प्राचार्य रवींद्र सोनवणे, डॉ.रवींद्र माळी,एस. डी.ओसवाल, नोबेल फाउंडेशनचे जयदीप पाटील, सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव,रुसा समन्वयक डॉ.मुकेश भोळे, उपप्राचार्य डॉ.विजय मांटे, प्रा.पराग पाटील,डॉ. कल्पना पाटील,डॉ.विजय तुंटे, डॉ.अमित पाटील, राकेश निळे,पत्रकार, विद्यार्थी अमळनेरातील प्रतिष्ठित नागरिक महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.रमेश माने तर आभार प्रा.नितीन पाटील यांनी केले. व्याख्यान यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी परिश्रम घेतले.