
अमळनेर:- तालुक्यातील कंडारी खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या नुकतीच सरपंच पदी आशाबाई रामकृष्ण पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ग्रुप ग्रामपंचायत कंडारी खुर्द येथे मंगला दगडू पाटील यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदी तहसीलदार यांच्या आदेशानुसार दिनांक २९ रोजी मंडळ अधिकारी गौरव शिरसाठ यांच्या उपस्थितीत सरपंच निवड कामी विशेष सभा होऊन सरपंच पदी आशाबाई रामकृष्ण पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर सभेस सुनिताबाई पिंटू भिल, विकास सुरेश पाटील (मा.उपसरपंच) कमलबाई भाईदास भिल (मा.सरपंच), सुनंदाबाई सतीलाल पवार (मा.सरपंच) मंगलाबाई दगडू पाटील (मा.सरपंच ) वरील सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत अधिकारी नरेश सूर्यवंशी, ग्राम. महसूल अधिकारी महेंद्र पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी नाना पाटील यांनी उपस्थित राहून मंडळ अधिकारी यांना सभेच्या कामकाजासाठी सहकार्य केले. रामकृष्ण पाटील (चेअरमन, वि.का. सोसायटी) यांनी मनोगत व्यक्त करून सर्वाचे आभार मानले.