
अमळनेर:- जायन्ट्स ग्रुप अमळनेर विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत आलेला आहे. नुकतेच शालेय विद्यार्थ्यांना जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे स्नेहभोजन देण्यात आले.

जायन्ट्स ग्रुपने गलवाडे रोड अमळनेर येथील ममता विद्यालयाला भेट दिली असता विद्यार्थ्यांच्या सोबत काही तास घालवले. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून येथे जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर चे उपाध्यक्ष डॉ. महेश पाटील यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले.
या उपक्रमाच्या सुरवातीला श्री गणेश जयंती निमित्त तेथील गणेश मंदिरात शालेय विद्यार्थीसह जायन्ट्स सदस्य तसेच जायन्ट्स ग्रुप चे अध्यक्ष सुनील पाटील यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. शाळेतील शिक्षक वृंद व संस्थेचे अध्यक्ष डॉ मिलिंद वैद्य हेही उपस्थित होते.
याप्रसंगी, जायन्ट्स ग्रुपचे उपाध्यक्ष डॉ महेश पाटील , सेक्रेटरी संदीप महाजन सर, तसेच डायरेक्टर ,अँड राजेंद्र चौधरी, प्रा. पी. आर भावसार सर ,प्रा चंदुलाल बडगुजर नाना , रमेश महाजन, महेश पाटील, डॉ.निलेश शिंगाने नूतन सदस्य संजय मुंडके, आदी उपस्थित होते.या सर्व जायन्ट्स सदस्यांचे स्वागत ममता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वहस्ते बनवलेली गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. संस्थेच्या वतीने डॉक्टर मिलिंद वैद्य यांनी जायन्ट्स ग्रुपचे आभार मानले