
अमळनेर:- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या येथील प्रताप तत्वज्ञान केंद्रात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान वर्धमान महावीर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रताप तत्वज्ञान केंद्राचे मानद संचालक प्राचार्य डॉ. दिलीप भावसार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. धर्मसिंह पाटील यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. यावेळी सिनेट सदस्य दिनेश नाईक, प्रा.डॉ.धिरज वैष्णव, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र निकुंभ, प्रा.योगेश तोरवणे, प्रा.अवित पाटील, प्रा. प्रतिक्षा कुलकर्णी,पंडीत नाईक, विवेक सूर्यवंशी, उमेश अहिरराव, गिरीश चौधरी, गोपाल माळी, युनूस शेख, रईसा शेख आदींची उपस्थिती होती.




