अमळनेर – राज्यभरात सुरू असलेल्या १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या निम्मिताने अमळनेर तालुक्यातील परीक्षा केंद्र येथे जाऊन परिक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, अमळनेर व माजी मत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या तर्फे पेन व पुष्पगुच्छ देत परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मा.अध्यक्ष सनी गायकवाड, दर्शन पाटील, शहराध्यक्ष कृष्णा बोरसे,सायली बडगुजर,जनार्दन पाटील, मयूर बोरसे,शुभम गोसावी, खुशाल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते..
श्याम पाटील व सामाजिक कार्यकर्त्यांचे तहसीलदारांना निवेदन...अमळनेर:- नीट NEET परीक्षा प्रक्रियेत लाखो विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत अमळनेर तालुक्यातील नीटच्या विद्यार्थ्यांना घेऊन शहराध्यक्ष श्याम पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालयावर धडक देत तहसीलदार यांना निवेदन देऊन संतप्त विद्यार्थी व पालकांच्या भावना शासनापर्यंत पोहोचण्याची मागणी केली. अमळनेर…
विद्यार्थ्यांकडून जिमखाना फी आकारणी सुरू मात्र जिम तीन वर्षापासून बंद...अमळनेर:- येथील प्रताप महाविद्यालयात जिमखाना फी आकारली जाते मात्र जिम गेल्या तीन वर्षापासून बंद असल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने ठिय्या आंदोलन केले. विद्यार्थ्यांकडून प्रवेश प्रकिये दरम्यान भौतिक सुविधेच्या नावाखाली विविध प्रकारचे शुल्क आकारले जातात. त्यात जिमखाने साठी एका विद्यार्थ्या कडून दीडशे रुपये…
अमळनेर:- कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तज्ञ शिक्षण विभागाच्या दि. 30 जून 2021 शासनपत्र आदेशानुसार महाविद्यालयात विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन फी व जिम खाना, क्रीडा निधी संगणक शुल्क, वैद्यकीय मदत,ग्रंथालयीन निधी, प्रयोगशाळा,युथ फेस्टिवल व वसतिगृह शुल्कापोटी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करावे, तसेच अशा विविध शुल्कात सवलत देण्याबाबत राष्ट्रवादी…