
अमळनेर: तालुक्यातील तासखेडे येथील २१ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ रोजी उघडकीस आली असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तासखेडे येथील पंकज चंद्रकांत पाटील (वय २१) याने २४ रोजी दुपारी १२ ते २ च्या दरम्यान गावठाण शिवारातील त्यांच्या खळ्यात आत्महत्या केल्याची घटना ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने उघडकीस आली आहे. खळ्यातील पत्री शेड ला असलेल्या लोखंडी अँगल ला सुतीच्या दोरीच्या सहाय्याने त्याने गळफास घेतला.काही ग्रामस्थांच्या मदतीने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.अमळनेर पोलिस स्टेशन ला अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. संदेश पाटील हे करत आहेत.
मयत पंकज याचे वडील चंद्रकांत बापू पाटील हे शेती करतात.गावातील तरुणाच्या अकस्मात मृत्यूने गावावर शोककळा पोहोचली.

