
अमळनेर:- आंतरराष्र्टीय किन्नर आखाडा व्दारा अमळनेर येथील प्रसिध्द दादुभगत यांना प्रयागराज महाकुंभ येथे “महंत” ही पदवी श्री.अंनत विभुषी आचार्य महामंडलेश्वर डाॅ.स्वामी.लक्ष्मी नारायण त्रिपाठी माताजी यांच्या संस्काराव्दारा दिली गेली. दादु भगत यांचे नामकरण करण्यात आले असुन त्यांना”महंत श्रीमंत दादु पार्वती नंदगीरी जोगी” असे संबोधले जाणार आहे.
महंत पदवी प्राप्त झाल्यामुळे त्यांचा सत्काराचा कार्यक्रम २२फुटी हनुमान व अंबर्षी टेकडी गृप व्दारा दि.०२ रविवार रोजी सकाळी ८ वाजता पार पडला. संजय बाविस्कर व अश्विनी बाविस्कर यांच्या हस्ते शाल,श्रिफळ,गुलदस्ता देऊन श्रींमत महंत दादु पार्वती नंदगीरी जोगी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भदाणे, मोतीलाल जैन,डाॅ.अनिल वाणी,डाॅ.राजेंद्र सोनार सुरेश भावसार,डाॅ.चौधरी, नरेंद्र कांबळे, इंजी. हेमंत पाठक, गौरव चौधरी, योगेश येवले, रमेश कंजर, संजय पाटील, किशोर पाटील, अमोल पाटील, दिपक मोरे, राजेंद्र भावसार सर, हेमंत महाले, संजय कुंभार, राकेश पाटील, डाॅ अर्पना मुठे, रत्ना भदाणे, अरूणा चौधरी यांनी पण दादु भगतांचा फुलहार देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाऊसाहेब देशमुख यांनी केले. किरण कुंभार, आशिष चौधरी व हनुमानाचे पुजारी बनतोडे महाराज यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले.

