
अल्पसंख्याक विकास व हक्क फाउंडेशनची मागणी…
अमळनेर:- रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात माहिती फलक लावण्यात यावा अशी मागणी अल्पसंख्याक विकास व हक्क फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या या निवेदनात नमूद केले आहे की, अमळनेर ग्रामीण रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स व कर्मचारी यांचे नाव, वार, वेळ व संपर्क क्रमांक माहिती फलकावर लावण्यात यावे. जेणेकरून ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना संपर्क साधता येईल व त्यांची गैरसोय टळेल. यावेळी डॉ. प्रकाश ताळे यांनी निवेदन स्वीकारले.







