
अमळनेर:- तालुक्यातील एकलहरे येथील ३८ वर्षीय इसमाचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एकलहरे येथील प्रशांत सुरेश बेहेरे (पाटील) यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना त्याच्या चुलत भावाने बेटावद प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर नरडाणा येथे दाखल करण्याचा सल्ला मिळाल्याने नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉ. मनोज राजपूत यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत मारवड पोलीसात नोंद दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास स.फौ. किशोर पाटील हे करीत आहेत.







