अमळनेर:- येथील रहिवासी व सध्या अमरावती रायसोनी विद्यापीठात फार्मसी विभागात कार्यरत असलेले प्रा. प्रशांत युवराज माळी यांना पी. एच डी. प्रदान करण्यात आली.
प्रा. प्रशांत माळी यांना “निवडूंग आणि थोहर या औषधी वनस्पतींचे कर्करोगावरील जैवविश्वेषणात्मक वैज्ञानिक आन्वेषण विषयावर डॉक्टरेट ( पी. एच. डी.) मंदसौर विदयापिठातर्फे प्रदान करण्यात आली. विशेष म्हणजे या औषधीस भारत सरकारतर्फे पेटंट करण्यात आले आहे. अमळनेर तालुका औषधी विक्रेता संघाचे खजिनदार तसेच लोकसेवा मेडिकलचे मालक प्रवीण माळी यांचे प्रा. प्रशांत माळी हे लहान बंधु आहेत. क्षत्रीय कांच माळी समाज, औषधी विक्रेता संघ लोकसेवा गृप व संपुर्ण परिसरातुन सर्वत्र कौतुक होत आहे.