नॅनो शास्रज्ञ डॉ एल. ए. पाटील करणार मार्गदर्शन, उपस्थितीचे आवाहन…
अमळनेर:- बदलत्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सानेगुरुजी प्राथमिक ,माध्यमिक व कन्या शाळेतर्फे शिक्षक एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व या विषयावर विद्यार्थी केंद्री शिक्षकांचे प्रशिक्षण व कार्यशाळा २२ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी नाट्यगृहात आयोजित करण्यात आली आहे.
प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य नॅनो शास्रज्ञ डॉ एल. ए. पाटील यांचे व्याख्यान व मार्गदर्शन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे व प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी मंडळ उपस्थित राहणार आहेत. ३४ वर्षांनंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बदल होत असून बदलत्या शैक्षणिक धोरणाची योग्य अमलबजावणी होण्यासाठी शिक्षकांच्या मनातील शंकांचे निरसन होणे महत्त्वाचे आहे. गुणवत्ता पूर्ण शिक्षणातून देशाचा सुसंस्कृत नागरिक घडवण्यासाठी, राष्ट्रनिर्माणाच्या विधायक कार्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण आवश्यक आहे. म्हणून सर्व शिक्षकांनी प्रशिक्षणास उपस्थित राहण्याचे आवाहन सानेगुरुजी विद्यामंदिराचे मुख्याध्यापक संजीव पाटील , नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील व कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी केले आहे.