अमळनेर:- तालुक्यातील सुंदरपटटी आदर्शगांव येथील जि.प. शाळेत जून 2022 मध्ये इ. 1 लीत दाखलपात्र विद्यार्थ्यासाठी शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे लोकनियुक्त सरपंच सुरेश अर्जुन पाटील हे होते. अध्यक्ष व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते मेळाव्याचे फित कापून उदघाटन करण्यात आले. तसेच सेल्फी पॉईंटचे देखील फित कापून उदघाटन केले. मेळाव्या मध्ये दाखलपात्र विद्यार्थ्यासाठी सात प्रकारचे स्टॉलची मांडणी करण्यात आली. यात प्रत्येक दाखलपात्र विद्यार्थ्याचे विकासपत्र भरून घेण्यात आले व विद्यार्थ्याकडून विविध कृती करून घेण्यात आल्या. मेळाव्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्याना व पालकांना मार्गदर्शन केले. प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य अंगणवाडी सेविका, मदतनिस, स्वयंसेवक केंद्रप्रमुख विश्वास पाटील तसेच ग्रा.प. सदस्य व ग्रामस्थ बंधू, भगिनी तसेच पालक बंधू, भगिनी व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्या. संजय जगताप सर यांनी केले. सूत्रसंचलन विश्वास पाटीलसर यांनी केले. तसेच संपूर्ण मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका जयश्री बारड व श्रीम. स्मिता सोनवणे तसेच मेळाव्यासाठी नियुक्त्त केलेले स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम घेतले .