
अमळनेर:- तालुक्यातील जैतपिर येथील जि. प. केंद्र (प्राथ) शाळेत शाळा पुर्व तयारी मेळावा आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी माजी सरपंच निलेश शिवाजी बागुल हे होते. अध्यक्ष व व्यासपिठावरिल मान्यवरांच्या हस्ते मेळाव्याचे फीत कापुन उद्घघाटन करण्यात आले. मेळाव्यामधे दाखलपात्र विद्यार्थ्यासाठी सात प्रकारचे स्टॉल ची मांडणी करण्यात आली. यात प्रत्येक दाखलपात्र विद्यार्थीचे विकासपत्र भरुन घेण्यात आले विद्यार्थ्यांकडून विविध कृती करुन घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम प्रसंगी केंद्र प्रमूख गोसावी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुकेश राजपुत, सदस्य व अंगणवाडी सेविका, मदतनीस, स्वयंसेवक, ग्रा. पं. सदस्य, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचालन कविता पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक व शिक्षक यांनी परिश्रम घेतले. मेळाव्यास पालकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.







