
हिवरेबाजार येथे सरपंच परिषदेत पोपटराव पवार यांच्या हस्ते सन्मान…
अमळनेर:- तालुक्यातील दहीवदच्या सरपंच सुषमा देसले यांना सरपंच परिषदेत आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला.
22 एप्रिल रोजी आदर्शगाव हिवरेबाजार येथे सरपंच परिषद महाराष्ट्र मुंबई यांचे वतीने आयोजित कार्यक्रमात मा. पदमश्री पोपटराव पवार यांच्या शुभ हस्ते दहिवद येथील लोकनियुक्त सरपंच सुषमा वासुदेव देसले पाटील यांचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच हा पुरस्कार, सन्मान पत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी आमदार सुरेश आण्णा धस, आमदार निलेश लंके, आमदार प्रशांत बंब, दत्ताभाऊ काकडे, सरपंच परिषद प्रदेशाध्यक्ष विकास जाधव, उज्ज्वल चव्हाण, वसंत मुंढे, आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. गावात केलेल्या पारदर्शक कार्य व गावविकास कामाचे कौतुक यावेळी करण्यात आले. यावेळी दहीवद ग्राम पंचायत उपसरपंच बाळू आबा पाटील, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र माळी, रेखा पाटील, मालुबाई सुरेश माळी, आशाबाई माळी,तसेच सुनील माळी, मनोज भिल,नाना पाटील, गणेश पाटील, प्रदीप पाटील, भटू पाटील,संजय पाटील, कैलास महाराज, योगेश पाटील,जयश्री भदाने, धनराज पाटील, धनराज न्हावी,भैया पुजारी हे उपस्थित होते. हा मानाचा पुरस्कार सुषमा देसले यांना मिळाल्यामुळे त्यांचे सर्वच स्तरावरून कौतुक केले जात आहे.







