
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथे शनिवारी ५० किलो वजनी गटाच्या भव्य डे नाइट कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

मारवड येथील फ्रेंड्स कबड्डी क्लबतर्फे २२ व २३ रोजी या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या चार संघाला रोख बक्षीस व वैयक्तिक कामगिरीसाठी खेळाडूंना ही बक्षीस देण्यात येणार आहे. वि.का. सोसायटीच्या प्रांगणात या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून तालुक्यातील कबड्डी प्रेमींनी उपस्थिती द्यावी असे आवाहन फ्रेंड्स कबड्डी क्लबतर्फे करण्यात आले आहे.

