
अमळनेर- तालुक्यातील टाकरखेडा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर उत्तम पाटील यांचे नातू व श्री.शिवाजी हायस्कूल तांबेपूरा अमळनेर येथील पर्यवेक्षक एस. एम. पाटील यांचे चिरंजीव कु. आदित्य सुधाकर पाटील याने एम. बी. बी.एस. च्या शेवटच्या वर्षी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले तो मुंबई येथील द हिदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व आर एन कूपर मेडिकल कॉलेज मधून त्यांने ही पदवी संपादन केली. त्याच्या या यशाबद्ल त्याचे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य,ग्रामस्थ,शाळेतील सहकारी व नातेवाईक मित्रमंडळी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





