
अमळनेर:- तालुक्यातील वाघोदे येथील ग्रामपंचायत सरपंचपदी ज्ञानेश्वर श्रीराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी सरपंच चेतन काशिनाथ पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी ज्ञानेश्वर पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

यावेळी सभेचे निवडणूक अधिकारी म्हणून मंडळाधिकारी संजय चव्हाण यांनी कामकाज पाहिले. या निवड प्रसंगी माजी सरपंच चेतन पाटील, उपसरपंच कविता पाटील, ग्रामपंचायत सदस्य कौशल्याबाई पाटील, आशाबाई पाटील,प्रतिभा पाटील,अजय मोरे ग्राम विस्तार अधिकारी आर. एन.पाटील, तलाठी शितल पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी मच्छिंद्र भील तसेच ग्रामस्थ हजर होते.सदर निवड झाल्याने ज्ञानेश्वर पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्याचे वडील श्रीराम पाटील माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित आहेत.

