
ग.स. वाचविण्याचे रावसाहेब पाटील यांचे आवाहन…
जळगाव :- येथील जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची संस्था ही आशिया खंडातली सर्वात मोठी सोसायटी असून संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे.

या निवडणुकीत प्रगती शिक्षक सेना पॅनलचे सर्वेसर्वा रावसाहेब पाटील यांनी मतदारांना विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले आहे. या निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या अनेक माजी संचालकांनी ग. स. सोसायटी लुटण्यासाठी मोठा प्रमाणावर केलेली गैर कामे आपण मतदारांसमोर आणली आहे. संस्थेच्या विविध इमारती व भूखंड विक्री करून मोठा मलिदा मिळवून त्याचे वाटे पाडण्यात आले आहेत. नोटाबंदीच्या काळात सर्वसामान्यांचे नोटा बदलविण्यासाठी हाल होत असताना यापैकी काहींनी कोट्यवधीच्या नोटा बेकायदेशीर रित्या बनावट खाते उघडून बदलवून घेतल्या. व त्याप्रकरणी गुन्हे ही दाखल झाले. बेकायदेशीर नोकरभरती करून बेरोजगार सर्वसामान्य व पात्र उमेदवारांवर अन्याय करत स्वतःचा मुलगा, पत्नी, शालक, पुतण्या व नातेवाईक यांना भरती करण्यात आले. मागासवर्गीय तरुणांवर अन्याय करत स्वतःच्या इंजिनियर मुलांना शिपाई म्हणून लावले. संस्थेत विविध खरेदी व दुरुस्त्या दाखवून मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार करण्यात आला आहे. नवीन फर्निचर खरेदीत तसेच जुने फर्निचर कवडीमोल भावात विकून संस्थेचे आर्थिक नुकसान करण्यात आले आहे. अक्षरशः संडास दुरुस्ती मध्ये ही पैसे खायला कमी केले नाही. सेवानिवृत्त सभासदांचा मतदानाचा अधिकार काढून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. अश्या प्रकारे बेकायदेशीर कामकाज करून संस्थेची व सभासदांची यांनी वेळोवेळी फसवणूक केली असून यांच्या ताब्यातून ह्या संस्थेला वाचविण्याचे आवाहन करत असल्याचे रावसाहेब पाटील यांनी केले आहे.

प्रगती शिक्षक सेना पॅनलचा वचननामा…
1) मयत सभासदाच्या वारसांना संपूर्ण कर्ज माफी
2) मयत सभासदांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये अर्थसहाय्य
3) 15 लाख रु . वैयक्तिक विमा संरक्षण
4) डिजीटल ॲपची सुविधा
5) सभासद व कुटुंबासाठी भव्य मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल निर्मिती
6) विशेष कर्जात 10 लाख रुपयांपर्यंत वाढ
7) जामिनकी कर्जात 15 लाख रुपयांपर्यंत वाढ
8) राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे व्याजदर सुविधा
9) सभासद भगिनींसाठी भाऊबीज भेट योजना
10) सभासद पाल्यांच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी विशेष कर्ज योजना
11) सेवानिवृत्त सभासदांचा निवृत्तीच्या दिवशी यथोचीत गौरव व सत्कार
त्यामुळे दिनांक २८/४/२०२२ रोजी मतदानाच्या दिवशी ग. स. च्या विकासासाठी प्रगती शिक्षक सेना गटाच्या सर्व उमेदवारांच्या ढाल-तलवार या निशाणी वर बाण फुलीचा शिक्का मारून प्रचंड मतांनी विजयी करा व आपल्या सेवेची संधी द्या असे आवाहन प्रगती शिक्षक सेना पॅनलचे अध्यक्ष रावसाहेब मांगो पाटील यांनी केले आहे.
