
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड संचलित कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिक श्री. सचिन बापूराव पाटील यांना नुकतीच सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे विद्यापीठातर्फे ‘राज्यशास्त्र’ या विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांच्या या यशाबद्दल ग्रामविकास शिक्षण मंडळाचे आणि अमळनेर तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव मन्साराम पाटील, प्रभावती जयवंतराव पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष देविदास शामराव साळुंखे, सचिव देविदास बारकू पाटील, संचालक दिनेश वासुदेव साळुंखे आणि सर्व संचालक मंडळ तसेच कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवडचे प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी, सु.हि. मुंदडे हायस्कूल आणि द्रो.फ. साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय मारवड ,न्यू. इंग्लिश स्कूल प्र.डांगरी ,श्री. वि. या. पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडा शिक्षक आणि शिक्षेतकर कर्मचारी यांनी सचिन पाटील यांचे अभिनंदन करून कौतुक केले.