
अमळनेर: तालुक्यात आगीचे सत्र सुरूच असून मारवड येथील आगीत १२ जणांचे २९ लाख ५६ हजार ८७६ रुपयांचे नुकसान झाले आहे.
मारवड येथील खळवाडीला लागलेल्या आगीचा पंचनामा करण्यात आला असून पुंजू शिवलाल चौधरी यांचे ७ लाख ९१ हजार , प्रवीण आधार पाटील यांचे ३ लाख ७७ हजार , किरण वसंतराव साळुंखे (२ लाख २५ हजार ), कैलास रामचंद्र पाटील (२ लाख ७६ हजार), विलास प्रकाश पाटील (२ लाख ५० हजार), महेश हेमकांत पाटील (१ लाख ५० हजार रुपये ), सचिन गुलाबराव पाटील (१ लाख ३१ हजार),अशोक अमृत पाटील (१ लाख ३५ हजार),दिलीप नीलकंठ पाटील (१ लाख ३५ हजार), रवींद्र अमृत पाटील (८५ हजार),मांगो पितांबर पाटील (२ लाख ३१ हजार ८७६ रुपये), गजानन मन्साराम चौधरी (१ लाख ७० हजार रुपये) असे एकूण २९ लाख ५६ हजार ८७६रुपयांचे नुकसान झाले. ग्राम महसूल अधिकारी महेंद्र भावसार यांनी पंचनामा केला.