
अमळनेर:- शहरातील ताडेपुरा व पैलाड भागात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय संदेश रथयात्रेचे धनगर समाज बांधवांतर्फे जोरदार स्वागत करण्यात आले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने इंदोर ते चौंडी राज्यस्तरीय संदेश यात्रा धनगर समाजाचे नेते प्रल्हाद सोरमारे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली आहे.धनगर समाजाला एकत्र करण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी, जून्या चालीरीती नष्ट करण्यासाठी, शिक्षण, उद्योग आणि समाजाला संघटीत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ३१ मे २०२५ रोजी चौंडी जिल्हा अहिल्यानगर येथे राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर जयंती लाखोच्या संख्येने जनसमुदाय साजरी होणार आहे.पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य व कर्तुत्व माहिती व्हावे म्हणून अहिल्या संदेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे .अमळनेर येथे या संदेश रथयात्रेचे स्वागत महाराष्ट्र राज्य मौर्य क्रांती संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत,भाजपाचे माजी शहराध्यक्ष हरचंद लांडगे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त सेलचे तालुका अध्यक्ष एस.सी.तेले, युवा भाजप शहराध्यक्ष देवा लांडगे, हमाल मापाडी संघटनेचे तालुकाध्यक्ष रमेश देव शिरसाट, न.पा. शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष नितीन निळे,मच्छींद़ लांडगे,धनराज कंखरे,धनराज चिंचोरे,निवृत्ती कंखरे,मनोज कंखरे,अनिल ठाकरे,डी.ए.धनगर, निरंजन पेंढारकर,रवींद्र मोरे,उमेश मनोरे,प्रताप कंखरे,गोपाल हडपे,ईश्वर कंखरे, नारायण शिरसाठ,नाना शिरसाठ,बापू कंखरे ,दिलीप धनगर,आण्णा शिरसाठ,तुषार इधे यांनी केले.