
अमळनेर:- दर वर्षा प्रमाणे यंदाही सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्यामुळे मंगलादेवी मित्र मंडळ व संकल्प फाऊंडेशन तर्फे येणाऱ्या नागरिकांसाठी आणि शहरातील नागरिकांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची पाणपोई मंगला देवी चौक ,अमळनेर येथे बसवून एका चांगल्या उपक्रमाचा पायंडा पाडला असून या बाबत संपूर्ण मित्र परिवाराचे कौतुक होत आहे.

स्व.संतोष सोनू शेटे (मा. प्रशासन अधिकारी अमळनेर) यांच्या स्मरणार्थ पाणपोई चे उद्घाटन करण्यात आले तसेच आपल्या मंडळातील सभासद हर्षल महाजन याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्याच्या हस्ते पाणपोई च उद्घाटन करण्यात आले उद्घाटन प्रसंगी संकल्प फाऊंडेशन चे अध्यक्ष पंकज शेटे . धरम हटकर, शुभम येवले ,तुषार ठाकरे, निलेश निकम , राहुल बडगुजर, सागर सैंदाने,महेश मराठे,,चेतन पाटील .पप्पू महेश्वरी,फकिरा महाजन , सोनू पाटील, ,यश येवले ,अक्षय पोरवाल , भास्कर ठाकरे, धिरज शेटे इ. सर्व मंगला देवी मित्र मंडळाचे सभासद उपस्थित होते..

