
मुडी प्र. डांगरी येथील घटना, पोलीसात तक्रार दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथील १६ वर्षीय मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना दि २८ रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुडी प्र. डांगरी येथील १६ वर्ष ५ महिने वय असलेल्या मुलीला दि. २८ रोजी संध्याकाळी सात वाजल्यानंतर अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन असल्याचा फायदा घेत फुस लावून पळवून नेले आहे. याबाबत नातेवाईक व सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून न आल्याने २९ रोजी मुलीची आईच्या फिर्यादीवरून मारवड पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी भादवि कलम ३६३ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे. कॉ. भरत इशी करीत आहेत.




